परळी: डोक्यात दगड घालून आईचा खून केल्याची घटना परळी तालुक्यातील भोजनकवाडी येथे घडली
Parli, Beed | Sep 21, 2025 आपल्या जन्मदात्या आईलाच मुलाने डोक्यात दगड घालून संपवल्याची घटना परळी तालुक्यात घडली आहे. राहते घर नावावर करून देण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे.परळी तालुक्यातील भोजनकवाडीत ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. परळी तालुक्यातील भोजनकवाडीत पोटच्या मुलानेच राहत्या घरासाठी आईचा जीव घेतल्याची घटना रविवारी घडली. गेल्या काही दिवसापासून आरोपी चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे याला अटक केले आहे.