गडचिरोली: शहीद पांडू आलम सभागृह गडचिरोली येथे आत्म समर्पित नक्षलवाद्यांचा विवाह सोहळा संपन्न
गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलम सभागृहात आत्म समर्पित नक्षलवाद्यांचा विवाह सोहळा आज दिनांक ६ जून रोजी तीनच्या सुमारास थाटात संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, आहेंरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे व पोलीस अधीक्षक निलोतपल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.