पालघर: महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डब्यात उलटवाजांनी फोडले फटाके; वसईतील घटना; व्हिडिओ व्हायरल
हुल्लडबाज तरुणांनी महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डब्यात फटाके फोडल्याची घटना वसई परिसरात घडली आहे. वसई पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरात हुल्लडबाज तरुण रस्त्याच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या कचऱ्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब फोडत असल्याची घटना मोबाइल कॅमेरात कैद झाली आहे. बॉम्बच्या तीव्रतेने कचऱ्याच्या डब्याचे झाकण फुटून गेले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांच्या कृतीबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सदरचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.