“जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर समर्पण अखंड ठेवलं, म्हणून चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा मी उत्तीर्ण होऊ शकले!” अशा भावूक शब्दांत सोनाली जाधव यांनी आपला आनंद व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सोनाली बाळासाहेब जाधव या सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मानोरी ग्रामस्थ व रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.