पालघर: आचोळे परिसरात मैदानात ठेवलेल्या मंडप डेकोरेटरच्या सामानाला लागली भीषण आग
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात एका खुल्या मैदानात ठेवलेल्या मंडप डेकोरेटर चया सामानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.