अकोला: मलकापूर येथिल फटाका दुकानाला आग, आर्थिक नुकसान
Akola, Akola | Oct 19, 2025 मलकापूर येथे 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास गोपाल फटाका शॉपला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून, आगीमुळे दुकानाचे काहीसे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अधिक तपास सुरू आहे.