बल्लारपूर: बल्लारपूर शहरातील संत तुकाराम सभागृहात 180 भजन मंडळांना भजन साहित्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण
बल्लारपूर येथील तुकाराम सभागृह येथे बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करताना मन भरून आलं. बल्लारपूर मतदान संघात अनेक विकासकामे पूर्णत्वास नेत असताना भौतिक प्रगतीसोबत आत्मिक उन्नतीही साध्य व्हावी, या भावनेतून भजन साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. भजन हे मनाची साधना आहे; त्यातूनच चित्तशांती आणि समाधान लाभते.