भद्रावती: भद्रावती ऊपजील्हा रुगणालयाचा मार्ग मोकळा.
आदिवासी विकास परिषदेच्या पाठापुराव्याला यश.
भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन या दवाखाण्याचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी अखील भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे परीषदेचे प्रदेश महासचीव केशव तीराणीक यांच्या नेतृत्वात आरोग्य मंत्रालय, मुंबई यांचेकडे मागणी करण्यात आली होती. त्यांच्या या पाठापुराव्याला यश प्राप्त झाले असुन यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहे.यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.