भद्रावती: भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कनिष्ठ एथलेटिक स्पर्धेसाठी राज्य संघात शहरातील प्रणय ऊपासे यांची निवड.
भुवनेश्वर येथे होऊ घातलेल्या ४० व्या राष्ट्रीय कनिष्ठ एथलेटिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य धावपटु पथकात भद्रावती येथील १८ वर्षीय प्रणय ऊपासे यांची निवड करण्यात आली आहे. प्रणय ऊपासे यांच्यासह नागपूर विभागातील अन्य नव धावपटुंचा सहभाग आहे. प्रणय ऊपासे यांची महाराष्ट्र धावपटू पथकात निवड झाल्याबद्दल त्याचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.