पालघर: लिविंग रिलेशनशिपमध्ये तरीही दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध; प्रियकर आणि महिलेने तरुणाला संपवले; परनाळी येथील घटना; आरोपी अटकेत
पालघर तालुक्यातील बोईसर नजीक परनाळी प्रियकराने महिलेच्या दुसऱ्या प्रियकरची हत्या केल्याची घटना घडली. सुरेंद्र सिंग आणि रेखा वैष्णव लिवइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र रेखाचे हरीश सुखाडिया सोबत प्रेम संबंध होते. याची माहिती सुरेंद्रला मिळाल्यानंतर त्याने हरीशची हत्या केली आणि आरोपी सुरेंद्र आणि रेखा दोघेही फरार झाले. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत गुजरात मधील वापीयेथून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.