वर्धा: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीने केली काळी दिवाळी साजरी:शेतकऱ्यांच्या न्यायासाठी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन
Wardha, Wardha | Oct 21, 2025 दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भाजपा सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला माजी मंत्री रणजित कांबळे, महाविकास आघाडीतील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.