अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगच्या आरोपांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार होताच GMC प्रशासनात खळबळ माजली आहे. अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी तातडीने बैठक बोलावून कनिष्ठ व वरिष्ठ विद्यार्थ्यांची चौकशी केली. मात्र दोन्ही विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा प्रकार नाकारला. तरीही महाविद्यालयाच्या कॉरिडॉरमध्ये प्रकरण दडपण्याच्या चर्चांना उधाण आलं. रॅगिंग नसताना तक्रार आली आहे.