अकोला: अवैध सावकारीवर प्रशासनाचा घणाघात; १५१ एकर जमीन परत, २१९ प्रकरणांवर कारवाई, ६२ गुन्हे दाखल
Akola, Akola | Sep 25, 2025 अकोला जिल्ह्यातील अवैध सावकारीवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांमार्फत आतापर्यंत २१९ प्रकरणांवर कारवाई झाली असून, त्यापैकी ६२ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि १२४ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. या कारवाईतून १५१.६४ एकर शेतीजमीन, ४७७६ चौ.फुट जागा, एक फ्लॅट आणि १६३.५० चौ.मी. जागा मूळ मालकांना परत मिळाली आहे. प्रशासनाने नागरिकांना परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घेण्याचे आणि अवैध सावकारांकडून पैसे घेऊ नयेत, जिल्हा उप