मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांजरसुंबा येथे जाऊन रसाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा गावाला भेट देत स्व. सुग्रीव अण्णा रसाळ यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुग्रीव अण्णा रसाळ हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रसाळ कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि या कठीण प्रसंगी संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.