स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम' गीतमध्ये अल्पाक्षरत्व, अर्थपूर्णता आणि अर्थसंपन्नता ही तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 'वंदे मातरम्' हे एक मातृभूमीचे अमरस्तोत्र आहे आणि त्याचा गजर देशभर घुमत असताना पनवेलमध्येही वंदे मातरम गीताचे भव्य स्वरूपात समूहगायन झाले. नविन पनवेल मधील बांठिया विद्यालयाच्या मैदानावर झालेला हा राष्ट्रप्रेमी उत्सव मातृभूमीप्रती अभिमान, एकता आणि देशभक्तीची भावना जागवणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.