गडचिरोली: 'सातबाऱ्यासाठी' शेतकऱ्यांचा एल्गार! तुमिरकसा येथील शेतकरी आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलनाचा इसारा
गेल्या चार वर्षांपासून सातबाऱ्यापासून वंचित असलेल्या तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या जमिनीचा हक्क असलेला सातबारा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया किसान सभा करणार आहे.