हातकणंगले: माणगाववाडी येथे गावठी हातभट्टीच्या दारू विरोधात मोठी कारवाई गावठी दारूच्या ७ अड्डे उध्वस्त, ३.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
गावठी हातभट्टीच्या दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून,एकूण ७ अड्डे उद्ध्वस्त करत ३ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक बी.धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली १४ सप्टेंबर रोजी पहाटे केली. पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली साईनगर कणेरीवाडी, मोरेवाडी व माणगांववाडी (ता. हातकणंगले) येथे एकाचवेळी छापा टाकण्यात आला.