औंढा नागनाथ: जरांगे यांच्या आरोपानंतर समर्थकांकडून मंदिर कमान समोर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर औंढा नागनाथ शहरातील मंदिर समोर दिनांक 9 नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे हिंगोली जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्यासह समर्थकांची उपस्थिती होती. यादरम्यान समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.