मुंबई महानगरपालिकेचा बजेट पाहूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली असल्याचा आरोप आमदार राजेश बकाने यांनी केला आहे. या युतीचा मुंबई महानगरपालिकेत कुठलाही परिणाम होणार नसून, विदर्भात देखील या युतीचा कुठेही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ना उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे, त्यामुळे आम्हाला कुठलीही चिंता नसल्याचे मत आमदार राजेश बकाने यांनी व्यक्त केले आहे.