मनोज जरांगे पाटील यांनी इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर बोलताना ते म्हणाले की, "राज्यातील जनता आणि शेतकरी सुखी-समाधानी राहावा, हीच प्रार्थना मी साईबाबांच्या चरणी केली आहे. जनतेच्या हितासाठीच माझा सगळा संघर्ष आहे."