धर्माबाद: परतीच्या पावसाची धर्माबाद परिसरात जोरदार बॅटींग, अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांचा उडाला गोंधळ
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात कुठे वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलाय होती त्यानुसार आजरोजी धर्माबाद परिसरात दुपारी 4:30 ते 5:10 च्या दरम्यान अचानकपणे वारा पाऊस व ढगाचे गडगडाट पाहायला मिळाले अचानक सुरू झालेल्या पावसाने शहरातील नागरीकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळाले आहे.ह्या परतीच्या पावसाने चांगलीच बॅटींग केल्याचे दिसलें आहे.