जळगाव: किनगाव गावाजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; यावल पोलिसात गुन्हा दाखल
किनगाव गावाजवळ यावल-चोपडा रोडवर बोलेरो मालवाहतूक गाडीच्या धडकेने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता यावल पोलीस स्टेशनमध्ये बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.