खामगाव: रॅली प्लॉट येथे घरात घुसून एका इसमाने महिलेचा विनयभंग
एका इसमाविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घरात घुसून एका इसमाने महिलेचा विनयभंग केला तसेच तुमच्या मुलीशी लग्न करून दिली नाही तर तुम्हाला मारून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना रॅलीज प्लॉट येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून एका इसमाविरुद्ध २० सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजेदरम्यान गुन्हा दाखल केला आहे.