औसा: पावसात तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी औसा तालुक्यातील भादा येथे चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेतपाहणी
Ausa, Latur | Sep 16, 2025 औसा -औसा तालुक्यातील भादा गाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील उभ्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाले आहेत. या परिस्थितीची माहिती मिळताच औसा येथील तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी स्वतः आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गावात येऊन चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.