खालापूर: अल्पवयीन शाळकरी मुलीकडे रिक्षाचे स्टेअरींग, समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
खोपोलीत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. एका शाळकरी विद्यार्थीनीकडे त्याने रिक्षाचे स्टेअरींग दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही विद्यार्थीनी मुख्य रस्त्यावर इतर शाळकरी मुलींना घेऊन रिक्षाचालवत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झाली आहे. या घटनेला वाहतुक पोलीसांनी दुजोरा दिला असून, संबधित रिक्षा चालकावर कारवाईचे संकेत दिले आहेत.