नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारीमोरबे धरणाची 2050 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ लिकेजझालेली होती. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी तातडीने बंदकरण्यात आला होता. सद्यस्थितीत नवीमुंबई महानगरपालिकेमार्फत मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचेकाम युद्धपातळीवर हाती घेऊन 3.15 वाजता निर्धारित वेळेअगोदर पूर्ण झालेले आहे.त्यानुसारभोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरूकरण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचापाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल.