दिग्रस: महान तपस्वी श्री घंटीबाबा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न, घंटीबाबा मंदिरातून निघाली भव्य पालखी
दिग्रस शहरात आज दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता महान तपस्वी श्री घंटीबाबा यांचा भव्य पालखी सोहळा भक्तीभावात संपन्न झाला. घंटीबाबा मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. भजनी मंडळ, वारकरी समुदाय तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी शहरातील विविध मार्गाने निघाली. मार्गावरील नागरिकांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले आणि दर्शन घेतले. वातावरणात हरिनामाचा गजर आणि भक्तीभाव दाटून आला होता.