वैयक्तिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून केला. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.