जालना: जालना तहसील कार्यालयात साक्षरीसाठी नागरिकांची वणवण; 20 दिवसांपासून हेलपाटे
Jalna, Jalna | Jun 8, 2026 जालना तहसील कार्यालयात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या साक्षरीसाठी नागरिकांना तब्बल 20 दिवसांपासून हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही साक्षरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक नागरिक गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने आज काही संतप्त नागरिकांनी थेट कार्यालयातच