शिरूर कासार: सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलाडल्याने शिरूर कासार येथील संपूर्ण बाजारतळ पाण्यात गेला
सिंदफणा नदीला आलेल्या पूरामुळे शिरूर कासार परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत आहे. या पुराच्या पाण्यामुळे शिरूर कासार येथील बाजारतळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. गावातील मुख्य बाजारपेठ, दुकाने तसेच आसपासची अनेक ठिकाणे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांना आपली घरे, दुकाने आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची संधीही मिळाली नाही.