कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक विभागाचे कल्याण डोंबिवली महापालिकेला पत्र
Kalyan, Thane | Sep 26, 2025 कल्याण डोंबिवली शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे अशा आशयाचं पत्र वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला पाठवलं असल्याची माहिती वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांनी आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास दिली आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे पत्र पाठवलं आहे.