अड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात विद्यार्थिनींना व्यवसायिक शिक्षणाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. शालेय शिक्षणासोबतच व्यवसायिक कौशल्ये आत्मसात करून रोजगारक्षम बनावे व स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान विविध व्यवसायिक अभ्यासक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकतेचे महत्व, कौशल्याधारित शिक्षणाची गरज तसेच आधुनिक काळातील रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.