पालघर: वसई- भारतनगर परिसरातील फर्निचर हार्डवेअर दुकानाला लागली आग
वसई पूर्वेकडील भारत नगर परिसरात असलेल्या एका फर्निचर हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. मात्र आधी दुकानातील साहित्य व दुकान जळून खात झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.