नैसर्गिक शेतीमध्ये निवड पद्धतीने उसाची ज्ञानेश्वर १६ ही जात विकसित करून नेवासा तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी शास्त्रज्ञांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. असे गौरव उद्गार कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले. ज्ञानेश्वर १६ हा उसाचा वाण विकसित केल्याबद्दल विश्वनाथ चव्हाण यांना केंद्र सरकारने प्रशस्तीपत्र देऊन या उसाच्या जातीला मान्यता दिली आहे.