बंजारा समाजाची होळी : संस्कृती, परंपरा आणि लोककलांचे जतन करणारा उत्सव.. आज दिनांक 2 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना बंजारा समाजात होळी हा केवळ रंगांचा सण नसून, तो त्यांच्या प्राचीन संस्कृतीचा, परंपरांचा आणि लोककलांचा जिवंत वारसा मानला जातो. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत बंजारा तांड्यांवर हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणारा होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत रंगतो. तांड्यावर होळी पेटवून बोंब मारण्याची