अचलपूर: अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात संतापाचे वातावरण; २३ कर्मचाऱ्यांची आमदार प्रवीण तायडे यांच्याकडे लेखी तक्रार
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी उसळली आहे. परिचारिका व अटेंडंट यांना धमक्या देणे, अन्यायकारक ड्युटी वाटप, अनुपस्थिती व पगारातील विलंब यांसारख्या मुद्द्यांवरून तब्बल २३ कर्मचाऱ्यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर सर्वांनी स्वाक्षऱ्या करून निषेध नोंदविला आहे. या घडामोडींमुळे रुग्णालयात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.