परभणी: शेतकऱ्याची दिवाळी अंधारात असताना जिल्हा प्रशासन दिवाळी साजरी कशी करू शकतो : प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने
एकीकडे दिवाळी संपली तरीही परभणी जिल्ह्यातील ७०% शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे भेटले नाहीत. ज्यांना पैसे भेटले ते खूपच कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात झाली, कडू झाली अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन मात्र ज्या गोदावरी नदीच्या काठी सर्वात जास्त नुकसान झाले त्या गंगाखेड येथे दीप संध्या सारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचा जखमेवरती मीठ चोळण्याचे काम करीत आहे. असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी प्रशासनावर केला आहे