जालना: ट्रक कॅबिनमधील मोबाईल चोरी प्रकरण उघड; गंगापूरमधून आरोपी अटकेत; चंदनझीरा पोलिसांची कारवाई
Jalna, Jalna | Apr 18, 2026 रात्री ट्रकच्या कॅबिनमधून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला चंदनझिरा पोलिसांनी गंगापूर येथील पारधी वस्तीतून अटक केली आहे. शनिवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आहेत. ट्रक चालक फारुख शाबू शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते जालना–संभाजीनगर रोडवरील एमआयडीसी भागातील चौकाजवळ ते ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती.