भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू झाला. हा अपघात १४ डिसेंबर रोजी रात्री म्हाळुंगेत घडला.याबाबत २७ वर्षीय व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.