मुदखेड: दि. 7 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - शिवा संघटना राज्य उपाध्यक्ष तोनसुरे
ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी, शासनाने मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करणारा जीआर रद्द करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी करता जागा उपलब्ध करून द्यावे व सोयी सुविधा द्याव्यात अशा काही प्रमुख मागण्यासाठी दि.7 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे विराट धरणे आंदोलन होणार असून ह्या ह्या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तोनसुरे यांनी निवघा येथे आजरोजी दुपारी 2 च्या केले आहेत.