बाबू हरदास एल. एन. आणि कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या संयुक्त पुण्यस्मृती निमित्त आज कामठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते महोत्सवाचा प्रारंभ झाला.आज हरदास नगर येथून भव्य पालखी शोभायात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून जात कन्हान येथील हरदास घाट येथे पोहचली.