योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज व आयुर्वेद शिरोमणी आचार्य बाळकृष्णजी यांच्या आशीर्वादाने आणि पूज्य स्वामी परमार्थदेवजी व साध्वी देवप्रियाजी यांच्या प्रेरणेने, भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत व किसान सेवा समिती जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ जानेवारी रोजी ६:३० वाजता दरम्यान पतंजली योगपीठ व भारत स्वाभिमान न्यास हरिद्वारचा स्थापना दिवस श्रध्दापेठ येथील निरंकारी योगवर्गात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.