नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४२ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १७ रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास, संतोषी नगर येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या मागील गल्लीत हा इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता.नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.