सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही ठिकाणी गॅसचा तुटवडा होणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही. परंतु टीव्हीवरील बातम्यांमुळे अनेक नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होत आहे. त्यामुळे लोक गरज नसतानाही गॅस सिलेंडरसाठी एजन्सीकडे धाव घेत आहेत. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.