आज दि 3 डिसेंबर सकाळी 10 वाजता लग्न जुळवण्यासाठी ३ लाख रुपये घेतले व कोर्टात नोटरीद्वारे लग्न केल्यानंतर सासरी निघालेल्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथे उघडकीस आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील २९ वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची या प्रकारात फसवणूक करण्यात आली. अशोक बांदल यांचे वधू संशोधन सुरू होते. या काळात अरविंद राठोड याच्याशी दोन महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली. लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर अरविंदने त्यांच्या गावाकडे चांगल्या