उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेकायदेशीररीत्या वावरणाऱ्या आणि देशी दारूची विक्री करणाऱ्या एका तडीपार आरोपीला भंडारा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ७ जानेवारी रोजी रात्री ९:३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येथील सहायक फौजदार मोहरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भंडारा शहरातील शिवाजी वार्ड शुक्रवारी येथील वीरेंद्र बाबुराव चकोले (४३) याच्या घरावर पंचासमक्ष छापा टाकला असता, घराच्या छपरीतील कोपऱ्यात ८०० रुपये किमतीचे १८० एम.एल.चे १० नग देशी दारूचे..