गडचिरोली: जिल्हा परिषदेत अनुकंपा उमेदवारांचे १९ सप्टेंबर रोजी समुपदेशन
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड या संवर्गातील रिक्त पदे अनुकंपाधारक उमेदवारांद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णयान्वये व मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत या नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. यासंदर्भात ०१ जानेवारी २०२५ रोजीच्या प्रतिक्षाधिन सूचीतील उमेदवारांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद गडचिरोली येथे करण्यात आले आहे.