किनवट तालुक्यातील मांडवी येथील सरकारी दवाखाना समोर दि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान यातील फिर्यादीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक टिएस ०१/ इएम ३८१७ किंमती ५० हजाराची नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी श्यामराव किनाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.