काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राच्या विकासातील एक अत्यंत सुवर्णक्षण आणि ऐतिहासिक घटना साजरी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अशक्यप्राय वाटणारा जाम नदीचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला असून, कार प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १५ किलोमीटरपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता.