साकोली: निवडणूक काळात साकोलीतील शिवाजी वार्डात अवैध दारू तस्कर अटके,900 देशी दारूच्या बाँटल जप्त,1लाख6हजाराचा मुद्देमाल जप्त
साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेची निवडणूक मंगळवार दि.2 डिसेंबरला सकाळी7ते सायंकाळी5.30या वेळात घेतली जात असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली पोलिसांनी अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई करत सोमवार दि1 डिसेंबरला रात्री दहा वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी वार्ड साकोली येथील अमीत बोरकर यांच्याकडून 900 देशी दारूच्या बॉटल व वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल असा1लाख6हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी ही माहिती मंगळवार दि.2 डिसेंबरला सकाळी11ला दिली